पोलिसांनी पकडला देशी कट्टा व जिवंत काडतुसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

अकोला: दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गस्तीवर असताना चांदेकर चौक ते फतेह चौकात एक ऑटो पकडून त्यातील चौघांची चौकशी केली.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक देशी कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त करून त्यांना अटक केली. यातील एक आरोपी हा सराई गुन्हेगार आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांनी दिली. 

कोतवाली पोलिसांचे एक पथक रात्र गस्तीवर होते. त्यावेळी चांदेकर चौक ते फतेह चौक दरम्यान असलेल्या सांगलीवाला शोरूमजवळ जाताना दिसून आला. त्यांनी ऑटो क्र. एमएच - ३० - एए - ६९६४ थांबवित ऑटोचालकाची चौकशी केली.

ऑटोचालकासह इतर तिघांच्याही हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांची झडती घेतली. ऑटोमधील अनिल उत्तम रताळ (रा. आंबेडकरनगर), राजू मधुकर हिवराळे (रा. अनंत नगर), पंकज धनंजय दिघेकर (रा. अकोट फैल), अमोल दिगांबर पवार (रा. संजयनगर, मोठी उमरी) चौघांकडे पोलिसांना देशी कट्टा, जिवंत काडतूस, धारदार शस्त्र, लोखंडी सब्बल असे साहित्य जप्त केले. हे चौघेही दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याचे चौकशीत समोर आले.

ही कारवाई काेतवाली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात एएसआय जगदीश जायभाये, अनिल धनभर, प्रमोद डुकरे, विपुल सोळंके, ज्ञानेश्‍वर रडके, यशोधन जंजाळ, नागसेन वानखडे, अमित नोळे यांनी केली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेला ठाणेदार अनिल जुमळे उपस्थित होते.

Web Title: Police foiled robbery attempt in Akola