सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात बंदोबस्त वाढवला 

 औरंगाबाद ः सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सोमवारी बंदोबस्त वाढविण्यात आला. शहरात शक्तीप्रदर्शन करताना रॅपीड ऍक्‍शन फोर्सचे जवान.
औरंगाबाद ः सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सोमवारी बंदोबस्त वाढविण्यात आला. शहरात शक्तीप्रदर्शन करताना रॅपीड ऍक्‍शन फोर्सचे जवान.

औरंगाबाद - राज्याच्या सत्ताबाजारात जनता अक्षरश: बेजार झाली असुन राजकीय परिस्थिती अत्यंत टोकाची बनली आहे. बंडखोरी, शह काटशहाच्या राजकारणामुळे सत्तापेच आणखीनच वाढतच आहे. अशा स्थितीत राज्यात कायदा व सुव्यवस्था कोणत्याही क्षणी बिघडु शकते अशी शक्‍यता वाटल्याने पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. याबाबत आदेशही जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाकडून पाऊले उचलली जात असतानाच राजकारणात ऐनवेळी मोठा भुकंप झाला. रात्रीतून हालचाली झाल्या आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

यानंतर राजकीय गणिते बिघडली आणि घडामोडींना वेग आला. त्या पार्श्‍वभुमीवर राजकीय परिस्थिती नाजुक बनली आहे. एकीकडे आमदार फुटु नये, त्यांच्या पळवा-पळवीचे प्रकार घडू नयेत म्हणून त्यांना सुरक्षितस्थळी ठेवले जात आहे. पक्ष, राजकारण व आपसातील मतभेदावरुन कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ शकतो, अशी स्थितीच निर्माण झाली आहे.

याच धर्तीवर उच्चपदस्त सुत्रांनी माहिती दिली की, सद्यस्थितीचा फायदा समाजकंटक उचलण्याची शक्‍यता आहे. तसेच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये संभाव्य अनुचित प्रकार घडू शकतात. सद्य स्थिती पाहता राज्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एसआरपीएफची तुकडी पाठविण्यात आली आहे. तसेच स्थानिक पोलिसांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वच यंत्रणा यामुळे दक्ष असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही सुत्रांनी सांगितले. 

रॅपीड ऍक्‍शन फोर्सही तैनात 
राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पथसंचलन व शक्तीप्रदर्शनही पोलिसांचे सुरु आहे. संवेदनशिल जिल्ह्यात एसआरपीएफसोबतच रॅपीड ऍक्‍शन फोर्सही तैनात करण्यात आला आहे, असेही सुत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com