पीआय म्हणून आला अन्‌ किराणा नेला!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद - जिन्सी परिसरात पोलिस निरीक्षक म्हणून मिरवणाऱ्या एका तोतयाने दुकानदाराला गंडविले. आपण गुन्हे शाखेचे निरीक्षक असल्याचे सांगून त्याने चक्क किराणा माल घेऊन पैसे न देता निघून गेला. ही घटना तीन डिसेंबरला कैलासनगर भागात घडली.

मोहंमद युनूस हाजी अब्दुल गफ्फार (वय ४१) हे कैलासनगर भागात राहतात. येथेच त्यांचे न्यू जनता किराणा स्टोअर्स नावाने दुकान आहे. तीन डिसेंबरला दुपारी दुकानात एकजण आला. आपण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहोत, असा बनाव केला. निरीक्षक असल्याने उलटसुलट प्रश्‍न करण्यापेक्षा मोहंमद युनूस यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.

तोतयाने किराणा यादी काढून दुकानदाराला दिली. दुकानदारानेही माल काढला. एकूण बिल दहा हजार चारशे रुपये होताच त्याने परत आपण पोलिस निरीक्षक असल्याची आठवण करून देत माल स्वत:कडे घेतला. पोलिस निरीक्षक असल्याचे दरडावून सांगितल्याने दुकानदार शांत बसले पण तोतया गेल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Police Inspector Cheating Crime