पोलिस उतरवणार थर्टी फर्स्टची "नशा' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

लातूर - त्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यपींसाठी बिअर बारला पहाटे पाचपर्यंत चालविण्यासाठी परवानगी दिली असली तरी "थर्टी फर्स्ट'ची नशा मात्र पोलिस उतरविणार असल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी बंदोबस्ताची आखणी सुरू केली आहे. दारू पिऊन रस्त्यावर फिरणे व गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा मद्यपींचा "थर्टी फर्स्ट' पोलिस ठाण्यातच जाण्याची शक्‍यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ही कारवाई केली जाणार आहे. 

पार्ट्या करून सरत्या वर्षाला निरोप देण्याची प्रथा पडत चालली आहे. यानिमित्ताने चांगला महसूल गोळा करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबरला बिअर बारला पहाटे पाचपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. एफएल 2 (विदेश मद्य किरकोळ विक्री दुकान), एफएलडब्ल्यु दोन, एफएलबीआर दोन यांना रात्री साडेदहा ते पहाटे एकपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल 3 (परवाना कक्ष) यांच्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री दहा ते पहाटे पाच तर आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पाच या वेळेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल 4 साठी पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपर्यंत तर आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाचपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. 

मद्यपींवर असेल करडी नजर 
शासनाने मद्यपींची सोय केली असली तरी त्याचा दुरुपयोग करून या दिवशी दारू पिऊन इतरांच्या आनंदावर विरजण टाकण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातो. रात्री उशिरा ओरडत फिरणे, भरधाव गाड्या चालवून इतरांना त्रास देणे, दारु पिऊन धिंगाणा घालणे यातून मारामाऱ्या होणे अशा घटना सातत्याने घडतात. हे लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यादृष्टीने यात बंदोबस्ताची आखणी करण्यात येत आहे.

Web Title: Police insuring Thirty First