esakal | पोलिस कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले, पाऊण लाखाचा ऐवज पळवला
sakal

बोलून बातमी शोधा

crime logo.jpg

पोलिस कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले, पाऊण लाखाचा ऐवज पळवला

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील Hingoli नवीन वसाहतीत पोलिस कर्मचाऱ्यांचे घर फोडून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज पळवला. या प्रकरणी सोमवारी (ता.१२) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नांदेड Nanded रोड भागात पोलिसांची नवीन वसाहत आहे. या ठिकाणी पोलिसांची दीडशेपेक्षा अधिक घरे आहेत. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी राहतात. पोलिस वसाहतीच्या इमारत क्रमांक चारमध्ये ३० क्रमांकाच्या निवासस्थानात पोलिस कर्मचारी रवी सावळे हे राहतात. ते काही दिवसापूर्वी कुटुंबासह नातेवाईकाकडे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रविवारी नवीन पोलिस वसाहतीमध्ये प्रवेश केला. इमारत क्रमांक चारमधील इतर कर्मचाऱ्यांच्या घराला बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी पोलिस कर्मचारी सावळे यांच्या घराचा कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सामानाची नासधूस केली.police man house broken in hingoli

हेही वाचा: आंधळ दळतयं आणि कुत्रं खातयं, चित्रा वाघ यांची गृहखात्यावर टीका

तसेच लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. दरम्यान रविवारी सकाळी इतर कर्मचारी जागे झाले असताना त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला बाहेरून कडी लावण्याचा आल्याचे लक्षात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी इतर इमारतीमधील कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराच्या कड्या उघडल्या. यावेळी इतरत्र पाहणी केली असता रवि साळवे यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसाचे घर फोडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास लावण्याचा सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत.

loading image