पोलिसांच्या कारवाया, अन वऱ्हाडी मंडळींची पळापळ...

अनिरुद्ध धर्माधिकारी
Thursday, 19 March 2020

एका मंगल कार्यालयाच्या चालकाने प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत लग्न समारंभानिमित्त कार्यालयात गर्दी जमविली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी बीड-नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या चालकावर कारवाई केली.

बीड : आष्टी-नगर महामार्गावर एका मंगल कार्यालयात विवाह समारंभ आयोजित करून गर्दी झाल्याप्रकरणी, तसेच दोन ठिकाणी लग्न समारंभानिमित्त मंडप टाकून त्यामध्ये गर्दी जमविल्याबद्दल पोलिसांनी गुरुवारी (ता. 19) तीन ठिकाणी कारवाया केल्या. यामुळे पोलिसांच्या कारवाया अन व-हाडी मंडळींची पळापळ असे चित्र निर्माण झाले होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शासनाने जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तशा सूचना प्रशासनाकडून मंगल कार्यालयांना देण्यात आल्या असून, तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयांनी विवाह समारंभांच्या गुरुवारी (ता. 11) पासून पुढच्या घेतलेल्या सर्व तारखा रद्द केल्या आहेत.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

असे असूनही एका मंगल कार्यालयाच्या चालकाने प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत लग्न समारंभानिमित्त कार्यालयात गर्दी जमविली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी बीड-नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या चालकावर कारवाई केली.

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

तसेच तालुक्यातील केरूळ व जळगाव येथेही लग्न समारंभानिमित्त मंडप उभारण्यात येऊन या मंडपात विवाह समारंभ सुरू असल्याचे व यानिमित्त गर्दी जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी विवाह समारंभाच्या आयोजित केलेल्या दोघांवरही जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police In Marriage Coronavirus Ashti Beed News