पोलिस कर्मचारी ‘पॉझिटीव्ह’; नानलपेठ ठाणे सील !

file photo
file photo
Updated on

परभणी : नानलपेठ पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांला कोरोना विषाणुची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण ठाणेच सोमवारी (ता.२५) सील करण्यात आले. ठाण्याचे मुख्यद्वार बॅरीगेटस लावून बंद करण्यात आले आहे.
परभणी शहरातील पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांस कोरोना विषाणुची लागण झाल्याचा आहवाल रविवारी (ता.२५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. कोरोना विषाणु बाधित पोलिस कर्मचारी पोलिस वसाहतीमधील ईमारत क्रमांक १९ मध्ये या पोलिस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. हे पोलिस कर्मचारी नानलपेठ पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सदर निवासस्थान असलेला परिसर देखील सील करण्यात आला असून निर्जंतूकीकरणाचे काम सुरु आहे.

कुटूंबियाच्या तपासण्या

या इमारती मधील रहिवाशी पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटूंबियाच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत.  कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब घेण्याचे काम रविवारी (ता.२४) रात्री सुरु करण्यात आले आहेत. हे पोलिस कर्मचारी नानलपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी नानलपेठ पोलिस ठाणेच सील करण्यात आले आहे.


कर्मचाऱ्याच्या मित्रांचे स्वॅब घेणार 
ज्या पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणुची बाधा झाली आहे. त्या पोलिस कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी मित्रासोबत पार्टी केली असल्याचे ही समजते. त्यामुळे या पार्टीत असणारे त्यांचे मित्र देखील संशयीत म्हणून धरले जाणार असून त्यांचे ही स्वॅब घेतले जातील असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.


रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरू
परभणी जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या पुढाकारातून व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिसोदिया पॅथोलॉजी लॅब यांच्या सहकार्याने रविवार (ता. २४) कोरोना संशयित रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरू करण्यात आली आहे.

रुग्णांची संख्या ३६ वर
दरम्यान, रविवारी (ता. २४) रात्री साडे दहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एकच दिवशी पहिल्यांदाच इतके रुग्ण आढळले असून यात गंगाखेडमधील आकरा, परभणी दोन, आणि सेलूच्या एका रुग्णाचा समावेश'आहे. जिल्ह्यात एकुण रुग्णांची संख्या ३६ वर गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities
Unknown Young Man Found Dead In Godavari River Near Kaygaon Body Kept At Gangapur Hospital For Identification
Parbhani SIR
Shirur Kasar Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com