दीड वर्षाच्या चिमुकलीला घरी ठेवत ‘त्या’ कर्तव्यावर 

उमेश वाघमारे 
Saturday, 25 April 2020

आपल्या दीड वर्षाच्या लहान मुलीला घरी ठेवून ‘त्या’ लॉकडाउनचा बंदोबस्त करीत आहेत. या मुलीचा संभाळ करण्यासाठी त्यांनी मावशीबाईंची मदत घेतली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असताना दीड वर्षाची चिमुकली आपली आई घरी कधी येणार, याची वाट पाहत असते. 
 

जालना - कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टरांप्रमाणेच पोलिसही आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांसाठी रस्त्यावर कर्तव्य बजावीत आहेत. यातीलच एक कदीम जालना पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड. आपल्या दीड वर्षाच्या लहान मुलीला घरी ठेवून ‘त्या’ लॉकडाउनचा बंदोबस्त करीत आहेत. या मुलीचा संभाळ करण्यासाठी त्यांनी मावशीबाईंची मदत घेतली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असताना दीड वर्षाची अद्वैता ही आपली आई घरी कधी येणार, याची वाट पाहत असते. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात देशात आणि राज्यात ता. २२ मार्चापासून लॉकडाउन लागू करण्यात आले. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा बंद आहेत; मात्र तरी देखील नागरिकांची रस्त्यावर सतत गर्दी असते. त्यामुळे पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी बारा-बारा तास रस्त्यावर उभे आहेत.

हेही वाचा : त्यांच्या’साठी आता जिल्हाच बनलंय कुटुंब...

कदीम जालना पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड यादेखील आपले कर्तव्य बजावीत आहेत; मात्र हे कर्तव्य बजावीत असताना त्यांना आपल्या दीड वर्षाची मुलगी अद्वैता हिच्या सुरक्षेसह तिचा संभाळ करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची गरज होती. त्यात त्यांचे पतीही एका बियाणे उत्पादक कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने अत्यावश्यक सेवांत मोडत असल्याने त्यांना रोज कंपनीत जाणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : आता सारेकाही जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी.... 

दरम्यानच्या काळात अचानक लॉकडाउन लागू झाल्याने त्यांना आपल्या नतेवाइकांना घेऊन येणे शक्य झाले नाही. परिणामी निशा बनसोड यांनी मुलगी अद्वैता हिचा सांभाळ करण्यासाठी मावशीबाईंची मदत घेतली आहे. अद्वैताला मावशीबाईंच्या स्वाधीन करून त्या बारा-बारा तास कर्तव्य बजावीत आहेत. 

हेही वाचा : कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबत जनतेची काळजी 

या सर्व धावपळीमुळे एक आई-मुलीच्या नात्याची ओढाताण होत आहे; मात्र, कोरोनाच्या लढ्यात सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड या आपले कर्तव्य बजावीत आहेत. कर्तव्य बजावून घरी गेल्यानंतर मुलगी अद्वैता आईकडे झेपावते; मात्र पूर्णपणे सॅनिटाझरिंगसाठी एक तासाचा अवधी जातो. त्यानंतर त्या आपल्या चिमुकलीला जवळ घेतात. पोलिसांवरील तान कमी करण्यासाठी आता तरी नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, हीच अपेक्षा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officers efforts public health