नांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त 

Nanded Strict police protection for Shiv Jayanti
Nanded Strict police protection for Shiv Jayanti

नांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोनचे लक्ष राहणार असून स्वत: पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची नजर राहणार आहे. 

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (ता. 19) मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. शिवभक्त आपल्या लाडक्या राजाची मिरवणूक काढून त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करणार आहेत. शहरात सर्वत्र मुख्य चौक व रस्त्यावर महाराजांचे कटआऊट लावून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

मंगळवारी शहर व जिल्ह्यातून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या दरम्यान काही समाजकंटक मिरवणुकीत घुसून कायदा व सुव्यवस्था बाधीत करु शकतात. त्यामुळे अशा प्रवृतीवर लक्ष केंद्रीत करून त्यांचे डाव उधळून लावण्यासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले. मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले असून प्रत्येकाची हालचाल टीपण्यासाठी ड्रोन कॅमेरे घिरट्या घालणार आहे. मिरवणुकीत शिवभक्तांनी होशमध्ये राहून जोश गमावून बसु नये. तसेच मिरवणुकीत डीजे लावून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश धुडकावून लावू नये.

शहर वाहतूक शाखा व पोलिसांनी घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी केले आहे. सध्या देशावर फार मोठे संकट असून जवळपास 45 जवान हुतात्मा झाले आहेत. संबंध देश दुखात बुडाला असाताना शिवजयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फुजूल खर्चाला फाटा देत हुतात्म्यांच्या परिवाराला मदत होईल अशी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिल्यासारखे होईल असेही श्री. जाधव यांनी म्हटले.

शहरात असा आहे बंदोबस्त : 
पोलिस अधिक्षक एक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक एक, उपाधिक्षक दोन, पोलिस निरीक्षक 17, सहाय्यक पोलिस निरीक्षक/ फौजदार 74, पोलिस कर्मचारी 771, आरसीपीच्या आठ तुकड्या, राज्य राखीव बलाची एक कंपनी, गृहरक्षक दलाचे 550 जवान यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्षातील कर्मचारी असा दीड हजार पोलिस तैनात केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com