नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15 हजार रुपयाचा एेवज जप्त केला. ही कारवाई नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकांनी रविवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता केली.
 

नांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15 हजार रुपयाचा एेवज जप्त केला. ही कारवाई नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकांनी रविवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता केली.

नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन मोरे हे आपल्या पथकासह हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जवाहरनगर तुप्पा परिसरात असेलल्या पाटबंधारे कार्यालयाच्या मोकळ्या जागेत झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याचे समजले. त्यांनी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या ठिकाणी त्यांनी छापा टाकला.

जुगाराच्या डावावरून शेख शम्मु शेख रुपत, रघुनाथ विठ्ठलराव कदम, अशोक बाबासाहेब कदम, कचरु व्यंकट कदम, शेख फरीद शेख रुस्तुम, संघरत्न भगवान पोकाटे, बालाजी गंगाधर कदम, महाजन रावसाहेब कदम, पांडूरंग सटवाजी तुरतलेवाड, हुसेनखान पाशाखान, बालाजी बंजु गंदलवाड, लक्ष्मण मोतीराम वाठोरे, अशोक मारेाती निलेवाड आणि गोविंद पांडूरंग भुते यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 15 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. गजानन मोरे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुर्यवंशी हे करीत आहेत.

Web Title: Police raid in gambling place in Nanded