esakal | हिंगोलीत अवैध दारुसाठ्यावर पोलिसांचा छापा; २० हजाराचा माल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

सेनगाव दारुसाठा

हिंगोलीत अवैध दारुसाठ्यावर पोलिसांचा छापा; २० हजाराचा माल जप्त

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील साखरा पाटीजवळ सुरु असलेल्या अवैध दारुसाठ्यावर छापा टाकून १९ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल मंगळवारी (ता. २५) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

कोरोना काळात सर्व काही बंद असताना देखील अवैध धंदे खुलेआम सुरु असल्याचे चित्र आहे. सेनगाव तालुक्यात अवैध दारुचा महापुर सुरु असताना दारु विक्रेत्यांवर कार्यवाही केली जात नव्हती. मात्र मंगळवारी (ता. २५) तालुक्यातील साखरा पाटीजवळ एका वेल्डिंगच्या दुकानासमोर एक व्यक्ती अवैध दारु विक्री करीत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

हेही वाचा - काही दिवसात हे मैदान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. यासाठी वेळापत्रक भिंतीवर लावले जाणार असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले

सेनगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या ठिकाणी छापा मारुन देशी दारुचे चार बॉक्समध्ये १९२ दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्या दारुची किमत १९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार शंकर जाधव यांनी ही कारवाई केली आहे. तालुक्यात इतर ठिकाणी सुध्दा अवैध दारु विक्री सुरु असून यावर कार्यवाही होणार की नाही असा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे. रिसोड येथून सेनगाव येथे अवैध दारुसाठा पुरवला जात असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे या अवैध दारु विक्रेत्यांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे