लॉजवर छापा टाकून तीन महिलांसह तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

पाटोदा तालुक्‍यातील सौताडा परिसरात मंगळवारी (ता. दोन) मध्यरात्री पाटोदा पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकून केलेल्या कारवाईत देहव्यापार करणाऱ्या महिलांसह तीन ग्राहक व हॉटेलच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पिटा) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाटोदा - पाटोदा तालुक्‍यातील सौताडा परिसरात मंगळवारी (ता. दोन) मध्यरात्री पाटोदा पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकून केलेल्या कारवाईत देहव्यापार करणाऱ्या महिलांसह तीन ग्राहक व हॉटेलच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पिटा) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की मंगळवारी मध्यरात्री साडेबारा, एकच्या सुमारास पोलिसांच्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत धनगर जवळका शिवारात पोलिस पेट्रोलिंग करत असताना त्यांना सौताडा परिसरातील एका लॉजवर अनैतिक व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक एस. जे. माने, पोलिस नाईक सुभाष मोठे, आबा गोत्राळ, नंदकिशोर बासर, महिला पोलिस कर्मचारी गंधकवड यांच्या पथकाने हॉटेल संकेत लॉजवर रात्री दीडच्या सुमारास छापा टाकला. त्या ठिकाणी स्वप्नील हरिभाऊ डोंगरे वेश्‍याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली.

यानंतर पोलिसांनी तळघरातील खोल्यांमधून तीन महिलांसह महादेव हरिभाऊ डोंगरे (वय ३६, रा. मोहा, ता. जामखेड), हनुमंत अंबादास सुद्रिक (वय ३५, रा. पिंपरी घुमरी, ता. आष्टी, जि. बीड) व करण परसराम परकाळे (वय २४, रा. पिंपरी घुमरी, ता. आष्टी) हे तिघे महिलांसोबत अश्‍लील चाळे करताना आढळून आले. या महिला जामखेड येथील एका कलाकेंद्रातील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक एस. जे. माने यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपींना बुधवारी न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावून पीडित महिलांना सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Raid on Lodge Crime