
लातूर येथील एका लॉजवर अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथक व शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.
लातूर : येथील एका लॉजवर अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथक व शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. पोलिसांनी बाहेर जिल्ह्यातील चार पीडित महिलांची सुटका केली. लॉजचा मालक, लॉजचालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील अवैधधंद्याच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार येथील जुना रेणापूर नाका भागात राजे बार ॲण्ड लॉजमध्ये लॉजचालक किशोर नरहरी तळेकर (वय ५२, रा. म्हाडा कॉलनी) हा ठाणे, मुंबई येथून महिलांना लॉजवर आणून वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी (ता.तीन) दुपारी चारला डमी ग्राहक लॉजवर पाठवले. त्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. यावेळी चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
आईने मामाच्या मदतीने केला स्वतःच्या मुलाचा खून, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पैशांचे आमिष
लॉजचालक किशोर तळेकर हा पैशांचे आमिष दाखवून ठाणे, मुंबईतील महिलांना लॉजवर आणतो व वेश्या व्यवसाय करायला लावतो. ग्राहकाकडून मिळणाऱ्या पैशांतून २५ टक्के रक्कम आम्हाला देतो, उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवतो. यात लॉज व्यवस्थापकही सहभागी असल्याची माहिती संबंधित महिलांनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.
तिघांविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लॉजमालक रमेश राजे, लॉजचालक किशोर तळेकर, व्यवस्थापक व्यंकट केरबा कांबळे या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नानासाहेब लाकाळ, उपनिरीक्षक डी. एफ. जाधव, सहायक निरीक्षक दीपाली गित्ते, पोलिस नाईक माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
जैन इंटरनॅशन, युनिर्व्हसल स्कूलची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला पाठविण्यात
संपादन - गणेश पिटेकर