जुगार अड्ड्यावर छापा, 12 जुगाऱ्यांवर कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मरखेल (जि.नांदेड) : बेकायदेशीररीत्या झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याच्या गुप्त माहितीवरून मरखेल पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत 12 जुगाऱ्यांवर कार्यवाही केल्याची घटना रविवारी (ता.12) मौजे होट्टल येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार यातील तानाजी लंकावाड, मारोती सूर्यवंशी, नागु लंकावाड, शिवाजी लंकावाड, जळबा सूर्यवंशी, हणमनलू दासरवाड, खाजामिया शेख, (सर्व रा.होट्टल) व शिवाजी राठोड रा.गवंडगाव तांडा, पिरसाब शेख, राजू शिळवने (दोघे रा.कुशावाडी), प्रकाश काळे, मारोती येवते (दोघे रा.देगलूर) आदीजण होट्टल येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरून पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, पोलीस नायक अंगद कदम, पोलीस शिपाई तातेराव केंद्रे, ग्यानोबा केंद्रे, सूर्यवंशी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून उपरोक्त बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील रोख तीन हजार दोनशे वीस रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले असून, पोलीस नायक अंगद कदम यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलिसांनी उपरोक्त बारा लोकांवर गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस जमादार प्रकाश कुंभारे हे करीत आहेत.
 
Web Title: police read on gambling, 12 gambler arrested