Latur News : बळीच्या बकऱ्यांनी घेतला पोलीस अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांचा बळी,एकूण नऊ जणांचं निलंबन

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेट समोर देण्यात आलेल्या बकराबळी प्रकरणी अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक समय मंडे यांनी एक पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची तर आठ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी पाठवण्याची कारवाई केली आहे.
police sacrificed goat udgir due to increase crime one suspended action against 8 police
police sacrificed goat udgir due to increase crime one suspended action against 8 policeSakal

उदगीर : येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेट समोर देण्यात आलेल्या बकराबळी प्रकरणी अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक समय मंडे यांनी एक पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची तर आठ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी पाठवण्याची कारवाई केली आहे. बळीच्या बकऱ्यांनी एकूण नऊ जणांचा जणांचा बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बकऱ्याचा बळी देण्याची घटना घडली होती त्याचे फोटो समाज माध्यमात वायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांना आदेशित केले होते. श्री भागवत यांनी बुधवारी (ता.७) रोजी दिवसभर प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षकांना पाठवण्यात आला होता.

या प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्यावर निलंबनाची कार्यवाही तर बालाजी घारोळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला,

शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्रे, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे व नजीर बागवान या आठ जणांवर मुख्यालय रवानगी करण्याची कारवाई केली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांची खाते निहाय चौकशी करण्यात येत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बकऱ्याचा बळी नेमकं पोलीस ठाण्याच्या गेटमध्येच का देण्यात आला? अंधश्रद्धेचा भाग नसेल तर हा काय प्रकार असावा याबाबत अद्यापही चौकशी सुरू असून यामध्ये अधिकाऱ्याने नवीन वाहन घेतलेल्या निमित्ताने जी पार्टी दिली ते खरोखरच नवीन वाहन आहे का? याचीही चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे पोलीस सुत्राकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com