दोन कोटी रूपये किंमतीचे पोलीसांनी चंदन पकडले; दोघा जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सध्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
police seized sandalwood worth Rs 2 crore case registered against two Police Station
police seized sandalwood worth Rs 2 crore case registered against two Police StationSakal

केज : बेकायदेशीररित्या चंदनाची वाहतूक करणारे वाहन पकडून त्यातील दोन कोटी आठ लाख रूपये किंमतीचे एक हजार दोनशे पस्तीस किलो ग्रॅम वजनाचे चंदन, वाहतूक करणारा टेम्पोसह तिघा जणांना पोलीसांनी रविवार (ता.०५) रोजी केज-धारूर रस्त्यावर ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभाग, सहाय्यक पोलीस अधिक्षक व केज पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने केली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कळंब शहराच्या दिशेने येऊन माजलगाव शहराकडे आलेल्या टेम्पो केज शहरापासून काही अंतरावर केज-धारूर रस्त्यावर आला असता पोलीसांनी हा टेम्पो आडवून पाहणी केली असता पोत्यात चंदन भरून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत टम्पोसह त्यातील दोन कोटी आठ लाख रूपये किंमतीचा एक हजार दोनशे पस्तीस किलो ग्रॅम वजनाचे चंदन व प्रितम काशिनाथ साखरे (रा. गुरूवारपेठ, अंबाजोगाई) व शंकर पंढरी राख (रा. कौडगाव, ता. केज) यांना रविवार पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चेतना तिडके व अतिरिक्त पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष सावजे,

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, नशीर शेख, तुषार गायकवाड, भागवत शेलार, कैलास ठोंबरे, हनुमंत खेडकर, संजय जायभाये व गणेश मराठे, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते, शिवाजी कागदे, संतोष गित्ते व मतीन शेख यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने केली आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी केज पोलीस ठाण्याला भेट देऊन या कारवाई संबंधीची माहिती जाणून घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com