पोलिस अधिक्षकपदी संजय जाधव रूजु; चंद्रकिशोर मीना यांनी नांदेड सोडले

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

राज्याचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री व गृहविभाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलींचे आदेश काढले होते. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद तर त्यांच्या जागी मुंबई येथे उपायुक्त असलेले संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते.

नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून स्विकारला. 

राज्याचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री व गृहविभाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलींचे आदेश काढले होते. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद तर त्यांच्या जागी मुंबई येथे उपायुक्त असलेले संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी सोमवारी (ता. पाच) रोजी नांदेड पोलिस अधिक्षक पदाची सुत्रे स्विकारली. नांदेड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांचा व अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ म्हणून जिल्ह्यात दबदबा निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यात श्री. मीना यांनी प्रयत्न केला. त्यात भिमाकोरेगाव प्रकरण, मराठा आरक्षण आंदोलन यासह सर्व जाती धर्माचे सण- उत्सव त्यांनी अतिशय शांततेत पार पाडले. पोलिस भरती घोटाळा, धान्य जप्ती प्रकरण यासह आदी गंभीर आरोपींना सळो की पळो करून सोडले होते. ती जबाबदारी आता संजय जाधव यांच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, मटका, गुटखा, जुगार यासह आदी अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांना नांदेड जिल्ह्याचा अभ्यास असून ते मागील काळात देगलूर उपविभागाचे पोलिस उपाधिक्षक म्हणून कार्यरत होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Police superintendent Sanjay Jadhav at nanded