रिकामचोटांच्या पार्श्‍वभागावर बसतायत फटके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

दुचाकी, चार चाकीतून फिरणाऱ्यांची विचारपूस करून विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांना पोलिस प्रशासनाने नाइलाजाने सुंदरीचा प्रसाद देण्याची वेळ आली. घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून सुंदरीच्या प्रसादाचे वाटप सुरू असल्याचे कळल्यानंतर शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी झाल्याचे पाहण्यास मिळाले.

जालना -  राज्यात संचारबंदी लागू झाले घरा बाहेर पडू नका, असे आवाहन केल्यानंतर जालना शहरात अनेक रिकामचोटांचा फेरफटका कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे मंगळवारी (ता.२४) संचारबंदी विनाकारण फेरफटका मारणाऱ्या रिकामचोटांच्या पार्श्‍वभागावर पोलिसांनी लाठीने चांगलेच फटके दिले. शहरात तसा सर्वत्र शुकशुकाट होता. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील दुकाने कडकडीत बंद ठेण्यात आल्या होत्या. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जीवना आवश्यक वस्तुच्या दुकाना वगळता सर्व दुकाना बंद आहे. मात्र, संचारबंदीत ही अनेक जण मंगळवारी (ता.२४) मुक्त संचार करताना दिसून आले. विशेष म्हणजे संचारबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून सतत विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

सोमवारी (ता.२३) रात्रीपासूनच शहरात पोलिसांकडून त्यांच्या वाहनांवरील स्पीकरवरून संचारबंदीसंदर्भात नागरिकांना माहिती देऊन, घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, जानलेकर या संचारबंदीसह कोरोना विषाणूला गांभिर्याने घेण्यास तयार नसल्याचे चित्र मंगळवारी (ता.२४) सकाळी पाहण्यास मिळाले.

हेही वाचा : ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली

दुचाकी, चार चाकीतून फिरणाऱ्यांची विचारपूस करून विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांना पोलिस प्रशासनाने नाइलाजाने सुंदरीचा प्रसाद देण्याची वेळ आली. घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून सुंदरीच्या प्रसादाचे वाटप सुरू असल्याचे कळल्यानंतर शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी ही सक्तीचीच करणे गरजेचे आहे. 

जिल्हा कडकडीत बंद 

संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्हा कडकडीत बंद होता. या मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील जीवनावश्याक वस्तुंची दुकाने वगळून इतर दुकान बंद आहेत. 

पोलिसांचा खडा पहारा 

शहरासह जिल्ह्यात चौका-चौका पोलिसांचा खडा पहारा आहे. तसेच पोलिसांकडून सतत गस्त सुरू आहे. विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांवर पोलिस कारवाईही करीत आहेत. 

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी घरात राहावे, जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येकाने संचारबंदीचे पालन करावे. 
- रवींद्र बिनवडे 
जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take action in Jalna