

Rajesh Tope Responds to BJP Joining Rumours, Sets Record Straight
sakal
घनसावंगी:'आपण घनसावंगी मतदारसंघातच आहोत. त्यामुळे माझा मुंबईत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश होणार. मला उमेदवारी मिळणार. या केवळ चर्चा आहेत', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते, माजी आमदार राजेश टोपे यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळली. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे.