Video : भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकरांची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले..

उमेश वाघमारे 
Friday, 28 August 2020

काही महिन्यांपूर्वी महिला तहसीलदारांबद्दल 'त्या हिरॉईन सारख्या दिसतात,' असे वक्तव्य करुन खळबळ उडवून देणारे भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.

जालना : काही महिन्यांपूर्वी महिला तहसीलदारांबद्दल 'त्या हिरॉईन सारख्या दिसतात,' असे वक्तव्य करुन खळबळ उडवून देणारे भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. महाबीजच्या कार्यालयासमोर निकृष्ठ दर्जाच्या बियाणांसंदर्भात आंदोलन करताना 'या xxxx नी महाराष्ट्राची माती केली, असे वक्तव्य लोणीकर यांनी आज (ता.२८) केले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! 

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२८) महाबीज कार्यालयासमोर निकृष्ठ बियाणांसंदर्भात आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरु होण्यापुर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलताना भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीप घसरली. राज्य शासनासंदर्भात खालच्या पातळीवर जावून टिका केली आहे. त्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सोयाबीनचे बियाणे महाबीज कार्यालयाच्या आवारात टाकून त्याचे दहन केले. यावेळी महाबीजकडून पुरविण्यात आलेल्या बियाणांपैकी सोयाबीनचे बियाणे निकृष्ठ निघाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांना प्रती हेक्टर पन्नास हजार रुपयांचे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. 

रावसाहेव दानवे यांनी ही केले होते बेताल व्यक्तव्य

राज्यभरात नेहमीच जालना जिल्हा चर्चेत राहीला आहे. यापुर्वी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांना साले शब्द उच्चारुन शेतकर्यांचा अपमान केला. त्यावेळी राज्यभरात जनतेने भाजपवर सडकून टिका केली होती. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political news MLA Lonikar absurd statement