पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: समाजाची बदनामी करु नका, बंजारा समाजाचे आवाहन

प्रवीण फुटके
Saturday, 13 February 2021

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त समाजमाध्यमांमध्ये चर्चिले जाणारे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण.

परळी वैजनाथ (जि.बीड) : परळी येथील बंजारा समाजाची युवती पुजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत आहे. ती थांबवा, बंजारा समाजाची बदनामी करु नका, असे येथे बंजारा समाजाच्या शनिवारी (ता.१३) झालेल्या बैठकीत समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले असल्याचे समाजातील स्थानिक नेत्यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त समाजमाध्यमांमध्ये चर्चिले जाणारे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण. या प्रकरणामध्ये पुजा चव्हाण व याच समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांची समाज माध्यमांमध्ये मोठी बदनामी होत आहे. ती बदनामी थांबवावी असे आवाहन येथे झालेल्या बंजारा समाजाच्या बैठकीत माध्यमांना आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी पुणे पोलीस चौकशी करत असून समाजाचा पोलिस व न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे.

त्यामुळे मागील चार -पाच दिवसांपासून समाजातील नेत्यांची जी बदनामी सुरू आहे. ती थांबवावी. न्याय देवता पुजाला नक्कीच न्याय मिळवून देईल. असे समाजातील नेत्यांनी इथे झालेल्या बैठकीत विश्वास व्यक्त करण्यात आला. तिच्या आई, वडिलांना पुजा अचानक आपल्यातून निघून गेल्याने मोठे दुःख झाले आहे. त्यामुळे ते कोठेही प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना दुःखातुन सावरण्यास काही वेळ लागणार आहे.

समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पुजा आमच्या समाजातील एक खंबीर युवा नेता होती. तिच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा भावना यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बैठकीस बाळासाहेब चव्हाण, डी.एस.राठोड, वसंत राठोड, संतोष राठोड , सुरेश पवार, अंकुश राठोड, प्रदिप चव्हाण, भगवान पवार, आकाश राठोड आदी उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Chavan Suicide Case Don't Defame Community, Banjara Community Appeal Parli Beed News