पती-पत्नीचा वेदनादायी एक्झिट, लग्न सोहळा आटोपून घरी परताना...

दिनेश शिंदे
Friday, 12 February 2021

चिकलठाणा पोलिस ठाण्यात हायवा ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

चित्तेपिंपळगाव(जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी (ता.औरंगाबाद) फाट्याजवळ औरंगाबादकडे जात असलेल्या भरधाव हायवा ट्रकने मोटारसायकला पाठीमागुन  जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. देवेंद्र थोरात व शालिनी देवेंद्र थोरात असे मृत पती-पत्नीची नावे आहेत.   

तुळजाभवानी मातेचे दर्शन ठरले शेवटचे, पुण्याच्या भाविकाचा तुळजापुरात भोवळ येऊन मृत्यू

याबाबत चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मोटारसायकलवरील पत्नी शालिनी देवेंद्र थोरात (वय४५) जागीच ठार झाली, तर पती देवेंद्र थोरात (वय५०, रा गेवराई तांडा, ता. औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांना चित्तेपिंपळगाव येथील पवार हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेतुन औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टारांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले.

स्मार्ट सिटीत तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी, आस्तिककुमार पांडेय यांचा महत्त्वाचा निर्णय

हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या शालिनी थोरात यांच्या शरीराचा हायवाने चिरडत नेल्याने चेंदामेंदा झाला होता. थोरात हे नातेवाईकांच्या लग्नावरून त्यांच्या घरी परतत होते. मात्र त्यांच्यावर काळाने अशा प्रकारे घाला घातला यात दोघांचाही मूत्यू झाला. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात हायवा ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा : औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Accident News Couple Died In Accident Near Nipani Phata