esakal | पूजा आत्महत्या प्रकरण: बंजारा समाजाची नाहक बदनामी थांबवा, अशी चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh News}

पीडितीची, आईवडिलांची, नातेवाईकांची व बंजारा समाजाची नाहक बदनामी तसेच वानवडी पोलिस ठाणे, पुणे येथे ता २५ फेब्रूवारी  रोजी संत सेवालाल महाराजांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने घोषणा करुन बंजारा समाजाच्या नावाने चुकीच्या पद्धतीने घोषणा करुन बंजारा समाजाची धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

पूजा आत्महत्या प्रकरण: बंजारा समाजाची नाहक बदनामी थांबवा, अशी चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड - सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. अनेक नव-नवीन घडामोडी घडत आहेत. तरुणीची बदनामी, बंजारा समाजाची बदनामी करत असल्याचे कारण देत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावी अशी तक्रार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यात धनराज घोगरे याचाही समावेश आहे.

वाचा - रक्षक बनला भक्षक! बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला विवाहितेवर बलात्कार, महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिले सुसाईट नोट


ही तक्रार अॅड.संगीत चव्हाण व कृष्णा राठोड यांनी केली आहे. तक्रारी म्हटले आहे, की युवतीचे अशोभनीय फोटो, आॅडिओ क्लिप, व्हिडिओ वारंवार प्रसारित करुन व पीडित युवतीचे चारित्र्याचे हनन करुन, बंजारा समाजाची नाहक बदनामी करणे, बंद फ्लॅटमध्ये कोणाची परवानगी न घेता गृह अतिक्रमण करुन बंद फ्लॅटमधून मोबाईल व लॅपटाॅप चोरुन स्वतःच्या फायद्याकरिता गैरवापर केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वेळीवेळी कायद्याचे उल्लंघन करुन , बेकायदेशीररित्या जमाव करुन मोर्चा आंदोलन करुन कायद्याची पायमल्ली करणे, पीडितीची, आईवडिलांची, नातेवाईकांची व बंजारा समाजाची नाहक बदनामी तसेच वानवडी पोलिस ठाणे, पुणे येथे ता २५ फेब्रूवारी  रोजी संत सेवालाल महाराजांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने घोषणा करुन बंजारा समाजाच्या नावाने चुकीच्या पद्धतीने घोषणा करुन बंजारा समाजाची धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

वाचा - शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची भर रस्त्यात छेड; वडील, मामांवर चाकू हल्ला

त्यामुळे दोषींवर भारतीय दंड संहिता१८६०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००, स्त्री अशिष्ठ रुपन प्रतिबंध अधिनियम १९८६, आपत्ती व्यवस्थापन कायदा २२०५, महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२० महामारी रोग अधिनियम १८९७, आदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी अॅड चव्हाण व राठोड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.  

संपादन - गणेश पिटेकर