रावसाहेब दानवेंच्या जिल्ह्यातील रेशन दुकानात निकृष्ट गव्हाचा पुरवठा

महेश गायकवाड
रविवार, 28 जुलै 2019

राज्य शासनाने भारतीय अन्न महामंडळाला उच्च दर्जाच्या धान्याची रक्कम अदा केलेली असताना  जिल्ह्यत निकृष्ट दर्जाच्या  धान्याचा पुरवठा झाला असून जिल्हा प्रशासनही हा गहु जनतेला विकण्याची बळजबरी करत असल्याचे  निवेदनात म्हटले आहे.

जालना : लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पाचव्यांदा निवडुण आलेले भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांची केंद्रात अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री पदावर वर्णी लागली. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यातील रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा गहु पुरवण्यात आला आहे. या प्रकरणी  शहरातील स्‍वस्‍त धान्य दुकानादरांनी शनिवारी (ता.27) निवेदनाद्वारे त्यांच्याकडे तक्रार केली आहे.

शहरातील स्‍वस्‍त धान्य दुकानात जुलै महिन्यात निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा झाल्याने ग्राहक आणि दुकानदारात वाद होत असल्याची तक्रार जालना शहर स्‍वास्‍त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक महासंघाने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे शनिवारी  केली आहे.

राज्य शासनाने भारतीय अन्न महामंडळाला उच्च दर्जाच्या धान्याची रक्कम अदा केलेली असताना जिल्ह्यत निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा झाला असून जिल्हा प्रशासनही हा गहु जनतेला विकण्याची बळजबरी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या काळात महत्वाचे असतात त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी आपल्याकडे असल्यामुळे या बाबीकडे लक्ष देण्याची विनंती   मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष मनित कक्कड, सचिव संकेत पाटील यांच्या स्‍वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poor quality wheat in Jalna district