परतीच्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांची आठवडे बाजारात धांदल

भाऊसाहेब चाेपडे
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

आळंद (ता.फुलंब्री) परिसरात शुकवारी (ता.18) दुपारनंतर परतीच्या पावसाने काही क्षणात धुवाँधार हजेरी लावली. यामुळे  येथील आठवडे बाजार असल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची एकच धांदल उडाली.

आळंद (जि.औरंगाबाद) :  आळंद (ता.फुलंब्री) परिसरात शुकवारी (ता.18) दुपारनंतर परतीच्या पावसाने काही क्षणात धुवाँधार हजेरी लावली. यामुळे  येथील आठवडे बाजारात व्यापाऱ्यांसह ग्राहकांची एकच धांदल उडाली. चिखल झाल्याने व्यापाऱ्यांचे हाल झाले. तसेच दुपारनंतर बाजारात  शुकशुकाट दिसून आला.

वडोद बाजार, आळंद, खामगाव, बाबरा परिसरात शुक्रवारी कडक उन असल्यामुळे शेतकरी सोंगणी , लाणी करणे, चारा जमा करणे , वळाही रचणे , कणसे सुकवणे  आदी कामे करत असतांना दुपारी दाेननंतर अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेेकांची कणसे, चारा, अखेर ओली झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post Monsoon Hit Farmers, Traders In Aland Weekly Market