पोस्टाच्या बॅंक सेवेला अखेर मुहूर्त 

गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

लातूर - बॅंकिंग क्षेत्र खेडोपाडी घेऊन जाता यावे या उद्देशाने टपाल विभागातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या "इंडिया पोस्ट पेमेंट' बॅंक'ला अखेर मुहूर्त मिळाला आहे. लातूरसह देशभरातील 650 शाखांत एकाचवेळी या बॅंकेची सेवा सुरू होईल. त्यासाठी एक सप्टेबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. 

एप्रिलपासून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक सेवा सुरू होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात 21 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे उद्‌घाटनाची ही तारीख पुढे ढकलण्यात आली. आता एक सप्टेंबरला पोस्ट पेमेंट बॅंक सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. दिल्लीत या बॅंकेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून, त्या त्या जिल्ह्यांतील बॅंक शाखांचे उद्‌घाटन खासदारांच्या हस्ते होईल, अशी माहिती टपाल विभागातील सूत्रांनी "सकाळ'ला दिली. 

अशा आहेत सुविधा 
- इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत इतर बॅंकांसारख्याच सुविधा 
- दूरध्वनी, मोबाईल, वीजबिल भरता येणार 
- खातेदारकांनी आयएफएससी कोड मिळणार 
- या बॅंकेद्वारे खातेदारकांना कर्ज मिळणार नाही 
- टपाल विभागातील कर्मचारी पाहणार बॅंकेचे कामकाज 

Web Title: post office start in latur India Post Payment bank