
वाई बाजार ः सध्या ‘कोरोना’च्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यातील सोशल मीडियाचा वापर करण्याचे एकमेव काम रिकामपणामुळे उरले आहे. असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यात नुकताच घडला. यात फेसबुकवरून आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणे एकाला चांगलेच भोवले असून या प्रकरणी सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचे गांभीर्य ओळखून पोस्ट कराव्यात किंवा माहिती शेअर करावी, अन्यथा याचा फटका कोणालाही बसू शकतो.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी समाज माध्यमावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर पोस्ट अथवा शेअर करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत.
एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती केल्याचा गुन्हा
(ता.तीन) एप्रिलला अविनाश शंकर भोयर (रा.गंगाजीनगर, करंजी) या इसमाने एका समाजाला लक्ष्य करून ‘एक कोटी भाजप समर्थक’ या फेसबूक ग्रुप पेजवर पोस्ट झालेल्या जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी व एका समाजाचा अपमान करून भावना दुखावणारी भेदभाव निर्माण करणारी एक पोस्ट शेअर केली होती. पोलिसांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून (ता.आठ) पोलिस हेडकॉन्स्टेबल भारत गबरू राठोड यांच्या फिर्यादीवरून अविनाश शंकर भोयर (रा.गंगाजीनगर, करंजी) या समाजकंटकाविरुद्ध धर्म, वंश, जन्मस्थान, निवास व भाषा इत्यादी कारणावरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे व इतर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
ग्रुप सेटिंग बदलली
एकंदरित सिंदखेड पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीमुळे समाज माध्यमावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कार्यवाहीच्या धास्तीने व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुप आपले ग्रूप ‘ओन्ली एडमिन सेंड मेसेज’ या मोडवर टाकले आहे.
जुगारावरून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
नांदेड : झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून नगदी व दुचाकी तसेच जुगाराचे साहित्य, असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लहाण (ता. अर्धापूर) परिसरात शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास केली. अर्धापूर तालुक्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ हे सहकाऱ्यांसह गस्त घालत होते.लहान परिसरात असलेल्या कॅनालच्या बाजूला एका लिंबाच्या झाडाखाली झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची त्यांची खात्री पटली. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करत सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. अड्ड्यावरून जुगाऱ्यांच्या चार दुचाकी व जुगाराचे साहित्य जप्त केले. या सर्व जुगाऱ्यांना सोबत घेऊन अर्धापूर पोलिस ठण्यात हजर केले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक जी. एम. मंगनाळे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.