'नाफेड'च्या खरेदीची तयारी जोरात  

उमेश वाघमारे 
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

जालना - ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत "नाफेड'कडून उडीद, मूग, सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी संस्था, खासगी बाजार समित्यांकडून उपअभिकर्ताचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा 135 टक्के पेरा झाला आहे. 

यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह उडीद, मूग पेरणीवर भर दिला आहे. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यात यावर्षी तब्बल एक लाख 30 हजार 282 हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर 20 हजार 20 हेक्‍टरवर मुगाचा पेरा झाला आहे; तसेच 11 हजार 293 हेक्‍टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा झाला आहे. त्यामुळे नाफेडनेही ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात उडीद, मूग, सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी उपअभिकर्ता म्हणून खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी संस्था, खासगी बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागितले आहेत. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीनचे पीक बाजारात दाखल होण्यापूर्वी जिल्ह्यात नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला खुल्या बाजारातही चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. 

हमीभाव जाहीर 
केंद्र शासनाकडून यावर्षीचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. यात मुगाला प्रतिक्विंटल सात हजार 50 रुपये, उडिदाला प्रतिक्विंटल पाच हजार 700, तर सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार 710 रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. 

सहकारी संस्था व खासगी बाजार समित्यांनी उडीद, मूग, खरेदीसाठी उपअभिकर्ता म्हणून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव ता. 19 ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत. 
- गजानन मगरे, 
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जालना. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of purchasing by Nafed