...अन् भडकलेल्या अध्यक्षा बैठकीतून गेल्या उठून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : सभागृह विषय समित्यांच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चा, निर्णय, ठराव, नियोजन अन्य सदस्यांना समजले पाहिजे.यासाठी बैठकांचे इतिवृत्त स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अवलोकनासाठी ठेवण्याविषयी शुक्रवारी (ता.21) स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा सुरु होती.

या चर्चेत काही सदस्यांनी इतिवृत्त का ठेवले जात नाही. न ठेवण्यात नियोजनात काही काळाबाजार आहे का असे वक्तव्य केले. काळाबाजार या शब्दावरून जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर भडकल्या. चर्चा करत असताना विचार पुर्वक बोलावे, प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टींचा कुठेही संबंध कसा जोडता असे म्हणत चिडल्या. यानंतर त्यांनी अस्वस्थ होऊन सभागृह सोडले.

त्यानंतर पाच दहा मिनिटे कामकाज ठप्प झाले. अध्यक्षांच्या भावना दुखावणे हा नव्हता, असे सदस्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्या सभागृहात परतल्यावर पुन्हा कामकाजाला सुरवात झाली.

Web Title: President wake up from meeting