एकाच नेत्याचा सिद्धांत, मूल्य देशावर लादता येत नाही : कन्हैय्या कुमार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

देशात खुलेआम संविधान जाळणे म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला होय, हुकुमशाही नेतृत्व, मनूस्मृतीच्या आधारावर समाज व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषदेत परभणी येथे शुक्रवारी (ता. 24) केला.  

परभणी : देशात खुलेआम संविधान जाळणे म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला होय, हुकुमशाही नेतृत्व, मनूस्मृतीच्या आधारावर समाज व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषदेत परभणी येथे शुक्रवारी (ता. 24) केला.   

परभणीत सभेनिमित कन्हैय्या कुमार आले असता बी. रघुनाथ सभागृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले, देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, दलित यांच्या समस्या वाढत आहे. चार वर्षांपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न करीत कन्हैय्या  कुमार यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले. एका नेत्याचा सिध्दांत, मूल्य देशावर लादता येत नाहीत. आमची वैचारिक लढाई असून अहिंसेच्या मार्गाने लढू असे, ते म्हणाले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप कन्हैय्या कुमार यांनी केला.

Web Title: press conference of kanhaiyya kumar in parbhani