esakal | गर्भपातासाठी दबाव; विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

beed

गर्भपातासाठी दबाव; विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: घर बांधण्यासाठी माहेरातून पैसे घेऊन ये म्हणून गर्भपातासाठी दबाव आणल्याने आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शेकटा (ता. गेवराई) येथे समोर आली. मोनिका भिमाशंकर भारती (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी पती भिमाशंकर भारती, दीर राहुल भारती, जाऊ मिनाक्षी भारती आणि सासू संजीवनी भारती यांच्या विरोधात मोनिकाचे वडील दत्ता गिरी यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मोनिकाचा विवाह आठ महिन्यांपूर्वी शेकटा येथील भिमाशंकर नारायण भारती याच्यासोबत झाला. ती गर्भवती होती. लग्नानंतर पाच महिन्यांनी घर बांधण्यासाठी माहेरातून पैसे घेऊन ये म्हणून मोनिकाचा छळ करण्यात येऊ लागला.

हेही वाचा: लातूरात सोयाबीनच्या दराची गगन भरारी

उपाशी ठेवून मारहाण करणे, गर्भपातासाठी दबाव टाकणे असे प्रकार तिच्यासोबत केले जात होते. या छळाला कंटाळून मोनिकाने रविवारी (ता. २५) विष प्राशन केले. यातच तिचा मृत्यू झाला. वडील दत्ता गिरी यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

loading image
go to top