‘या’ शहरात जागेचे भाव गगनाला...

gharkul
gharkul

नांदेड ः नांदेड शहर आणि शहरालगत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, बंगले या सर्वांच्याच किंमती अवास्तव वाढविल्यामुळे अनेक ठिकाणी प्लॉट, फ्लॅट अक्षरक्षः रिकामेच आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नांदेड शहर व आजूबाजूच्या ग्रामपंचायतींतील विविध भागांचा झपाट्याने विकास होत आहे. दिवसेंदिवस अनेक कुटुंबे नांदेडला शिक्षण, नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने येऊन वास्तव करत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्येत भर पडत चालली आहे. त्या मानाने सोयी सुविधा कमी असल्याने, तसेच काहींची आर्थिक परिस्थितीदेखील बेताची असल्याने किरायाने राहणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. विशेष करून मध्यमवर्गीयांना घरासाठी जास्त कसरत करावी लागत असून नाईलाजास्तव किरायाने रहावे लागत आहे.

किंमतीत विनाकारण वाढ
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे फ्लॅट, प्लॉट, रो हाऊस, बंगले, घरकुलांचीही गरज वाढत चालली आहे. मात्र, गेल्या वर्षभरातच प्लॉट, फ्लॅट, रो हाऊसेस, बंगले यांच्या किंमतीही दुपटीपासून ते दहापटीपर्यंत विनाकारण वाढवल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही हाताबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहरातील बांधकाम क्षेत्रातील ब्रोकर, दलालांनीदेखील त्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत. बांधकामाचेही दर वाढत चालले असल्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने घ्यावे गांभीर्य
मूळ शासकीय किंमत आणि ब्रोकर, दलाल, विक्रेत्यांकडून सांगितलेली किंमत यामध्ये जवळपास चार ते दहा पटीपर्यंत जास्तीचा फरक येत आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक जण घरे घेऊ शकत नाहीत. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासन आणि संबंधित विभागानेदेखील गांभीर्य घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. 

इतरांनी करावे सहकार्य
सर्वसामान्यांना, विशेष करून मध्यमवर्गीयांना परवडतील अशा फ्लॅट, प्लॉटची विक्री केली पाहिजे. तसेच रो हाऊस, बंगले यांची निर्मिती करण्याची गरज आहे. विविध बांधकामाशी निगडित संस्था, संघटना, बांधकाम व्यावसायिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.


परवडणाऱ्या घरांची करावी निर्मिती
नांदेड शहर आणि परिसरात फ्लॅट, प्लॉट, रो हाऊसेसची मागणी करणारे आमच्यासारखे अनेक जण आहेत. साचवून ठेवलेले पैसे, तसेच बॅंकेचे कर्ज काढून फ्लॅट, प्लॉट, रो हाऊस घेण्याची अनेकांची इच्छा आहे; पण किमती गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीत घरकुलांची निर्मिती करण्याची गरज आहे.
- संजय शिंदे, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com