पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कमेची चोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पुजाऱ्याचा डोक्यात दगड घालून खून करून देवीच्या मंदिरातील दनपेटीतली रक्कम चोरल्याची घटना तालुक्यातील वडमवली (दहिफळ) येथे मध्यरात्री घडली. 

केज  : पुजाऱ्याचा डोक्यात दगड घालून खून करून देवीच्या मंदिरातील दनपेटीतली रक्कम चोरल्याची घटना तालुक्यातील वडमवली (दहिफळ) येथे मध्यरात्री घडली. 

रामलिंग ठोंबरे (वय 55) असे या खून झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.  केज तालुक्यातील दहिफळ जवळ काही अंतरावर डोंगर दरीत वडमवली देवीचे मंदिर आहे. मंदिर परिसरात जवळपास मानवी वस्ती नाही. या ठिकाणी रामलिंग ठोंबरे हे पुजारी होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली. केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले घटनास्थळी पोचले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priest murdered in beed district

टॅग्स