पुजाऱ्याचा प्रामाणिपणा, अडीच तोळ्यांचे नेकलेस भाविकास केले परत

जगदीश कुलकर्णी
Saturday, 26 December 2020

भाविकांचे अनावधानाने शिध्यामधून आलेले अडीच तोळ्यांचे नेकलेस भाविकास परत देऊन पुजाऱ्याची भाविकाबाबतची प्रामाणिकपणा शनिवारी (ता.२६) पाहायला मिळाली आहे.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : भाविकांचे अनावधानाने शिध्यामधून आलेले अडीच तोळ्यांचे नेकलेस भाविकास परत देऊन पुजाऱ्याची भाविकाबाबतची प्रामाणिकपणा शनिवारी (ता.२६) पाहायला मिळाली आहे. गाजपूर (ता.धारूर) येथील भाविक महादेव मुंडे यांनी सांगितले की, आमच्या घरातील नातेवाईक तुळजाभवानी मातेच्या दश॔नासाठी आले होते. माझी भाची मीनाक्षी घुले (रा.टाकळी, ता.केज) हिने तिच्या गळ्यातील नेकलेस हरभऱ्याच्या डाळीमध्ये ठेवले होते. आम्ही तुळजाभवानी मातेस नैवेद्यासाठी गेलो. शिद्यामध्ये हरभरा डाळ सोबत आणली होती.

 

 

 
 

या डाळीमध्ये मीनाक्षी घुले यांनी जे नेकलेस ठेवले होते. हे माझी बहीण सुनंदा लाड (रा. लाडवडगाव, ता.केज) हिला माहितच नाही. सुनंदा लाड हिने डाळ ओतुन आणली आणि डाळीमधील नेकलेस ही पुजारी सोमनाथ अमृतराव यांच्याकडे दिले. आमच्या घरातील सर्व नातेवाईकांना नाही असे लक्षात आल्यानंतर आम्ही शोधाशोध केली. त्यानंतर पुजारी सोमनाथ अमृतराव यांच्याकडे चौकशी केली.

 

 
 

श्री अमृतराव यांनी ठेवलेल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये नेकलेस तसेच होते. श्री.अमृतराव यांनी नेकलेस भाविकांना परत केले. पुजारी भाविकांबरोबर किती चांगलेपणाने वागतात हे या घटनेमुळे दिसून येते. शनिवारी आज पुजारी सोमनाथ अमृतराव यांचा अडीच तोळ्याची वस्तु घेतल्यानंतर महादेव उत्तम मुंडे, विष्णू घुले यांनी सत्कार तुळजा भवानी मातेच्या महाद्वारासमोर केला.

 

 

पुजारी सोमनाथ अमृतराव यांना सोन्याच्या दागिन्यांची माहिती आम्ही दिली. त्यांनी तात्काळ आम्हाला हे सोने परत दिले. अडीच तोळ्यांचे सुमारे वजन असणारे सोने आम्हाला परत मिळाले. ही बाब आनंददायीच आहे.
- महादेव मुंडे,  भाविक, गाजपूर (ता.धारूर)
 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priest Returned Devotee Neckles Tuljapur Osmanabad News