bacchu kadu hakka yatra
sakal
फुलंब्री - आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हाच सर्वात मोठा शोक आहे. नेता मेल्यावर गावात बोर्ड लागतात, झेंडे लावले जातात, पण शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी मात्र आपण एकत्र येत नाही. निष्ठा ठेवा तर बापावर, मायवर; पक्षावर ठेवू नका. जाती-धर्माच्या नावाने आपल्याला एकमेकांशी भिडवले जाते आणि आपण सरकारशी लढण्याऐवजी आपसात भांडत असल्याचे मत माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.