वाढदिवसाऐवजी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला दिले प्राधान्य

sengaw photo
sengaw photo

 सेनगाव (जि. हिंगोली) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. यात सापडलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून सुप्रभा अकमार या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आई-वडिलांच्या लग्न वाढदिवसासाठी जमा केलेला गल्ला गुरुवारी (ता. दोन) तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे सोपविला आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला आहे.

तालुक्यातील पानकन्हेगाव येथील पाचवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या सुप्रभा अकमार या चिमुकलीने २६ जानेवारी रोजी गावातील जय जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. त्या वेळी तिला पैसे बचत करण्यासाठी प्लॅस्टिक गॅस सिलिंडरचा गल्ला बक्षीस म्हणून मिळाला होता. तो तिने घरी आणला.

सहायता निधीत मदतीचा ओघ वाढला

आई -वडील, आजोबा यांच्याकडून सुप्रभाला शाळेत जाण्यासाठी, चॉकलेट घेण्याकरिता पैसे दिले जात होते. त्या पैशाचे चॉकलेट विकत न घेता तिने पैसे गल्यात टाकण्यास सुरवात केली. मे महिन्यात आई-वडिलांचा लग्न वाढदिवस आहे. त्यासाठी गल्ल्यात रक्कम जमा केली जात होती. सध्या कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. विविध क्षेत्रातून सहायता निधीत मदतीचा ओघ वाढला आहे. 

तहसीलदारांनी सुप्रभाचे केले कौतुक

सुप्रभाला शाळेत शिक्षकांनी संकट काळात होईल तेवढे समाजकार्य करावे, ही शिकवण दिली होती. आपणही मदतीसाठी जमविलेले पैसे देण्याचा आग्रह तिने पालकांकडे धरला. सुप्रभा व प्रशांत अकमार यांनी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची भेट घेतली. चॉकलेटसाठी दिलेल्या पैशाची बचत करून ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची इच्छा व्यक्त केली. तहसीलदार श्री. कांबळे यांनी चिमुकलीच्या हस्ते पैशाचा गल्ला स्वीकारून सुप्रभाचे कौतुक केले.

मदतीसाठीही लहान मुलांचा पुढाकार 

 या वेळी मुख्याधिकारी शैलेश फडसे, प्रवीण महाजन, सुदाम मुंडे यांची उपस्थिती होती. सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीचे पालन मोठ्या नागरिकाकडून केले जात नाही. सोशल डिस्टन्स ठेवल्या जात नाही. एकत्र जमून गप्पा मारण्याचे प्रकार आढळून येतात. त्या तुलनेत लहान बालके जास्त काळजी घेतात. विनाकारण भटकने टाळत आहेत. तसेच कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठीही लहान मुले पुढाकार घेत आहेत.

पैशाचा गल्ला तहसीलदारांकडे सुपूर्द

कोरोना आजाराचा फैलाव झपाट्याने होत आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती आर्थिक मदत करण्यासाठी सरसावले आहेत. हे पाहून आपण ही शक्य तेवढी मदत करण्याचा आग्रह सुप्रभा हिने धरला. त्यावरून तिने जमलेल्या पैशाचा गल्ला तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
-प्रशांत अकमार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com