esakal | दक्षता घ्या, सूचनांचे पालन करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड 
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा व गर्दीही टाळली जावी, या हेतूने घरपोच सेवेचीही तरतूद करण्यात आली असून शिवभोजनच्या माध्यमातूनदेखील गरजूंना जेवण पुरविले जात आहे. या काळात नागरिकांनीही आवश्यक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. 

दक्षता घ्या, सूचनांचे पालन करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलिस यंत्रणेकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत आहे. त्यांच्या सूचनांचे पालन करा, पुढील काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी व घराबाहेर पडणे टाळण्याची दक्षता घेतलीच गेली पाहिजे. सर्वांनी एकत्रितपणे दक्षता पाळून कोरोना संकटाचा सामना करू, एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सरकारने संचारबंदीसह विविध पावले उचलली आहेत. 

हेही वाचा निर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर

घरपोच सेवेचीही तरतूद

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा व गर्दीही टाळली जावी, या हेतूने घरपोच सेवेचीही तरतूद करण्यात आली असून शिवभोजनच्या माध्यमातूनदेखील गरजूंना जेवण पुरविले जात आहे. या काळात नागरिकांनीही आवश्यक सूचनांचे पालन करावे, गर्दी टाळणे व घरी राहणे हाच दक्षतेचा उपाय आहे. या आजाराची लागण एका व्यक्तीला झाल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होऊ शकते. 

वेळेचे गांभीर्य ओळखा

त्यामुळे आपले कुटुंब, परिसर, शहर-गाव सुरक्षित ठेवणे ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. वेळेचे गांभीर्य ओळखा. कृपया कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका, कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाने विविध हेल्पलाइन नंबर प्रसारित केले आहेत, त्यावर संपर्क करा.

विविध पथक नियुक्त

 कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्ह्यात विविध पथक नियुक्त करण्यात आले असून अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधा. मात्र, घराबाहेर पडू नका, आपली अन् आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या व आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

येथे क्लिक करा लॉकडाउनचा रेशीम उत्‍पादकांना फटका
 
रामनवमी घरीच साजरी करा: महंत कौशल्यादास महाराज

हिंगोली : येथील खाकीबाबा मठात दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने गुरुवारी (ता.दोन) रामनवमी भक्‍तांनी मठात न येता घरीच साजरा करावी, असे आवाहन महंत कौशल्यादास महाराज यांनी केले आहे.शहरातून जाणाऱ्या औंढा नागनाथ रस्‍त्‍यावर कयाधू नदीच्या काठावर साडेतीनशे वर्षापूर्वीचा खाकीबाबा मठ आहे. 

कोणीही घराच्या बाहेर निघू नये

या मठात राममंदिर असून येथे दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्‍साहात साजरी केली जाते. भाविकांनी येथे येण्याचे टाळावे, सायंकाळी साडेसात वाजता अंगणात दिवे लावून रामनवमी घरीच साजरी करावी, कोणीही घराच्या बाहेर निघू नये, असे आवाहन खाकीबाबा मठाचे महंत कौशल्यासदास महाराज यांनी केले आहे.