खासगी बसधारकांनो सावधान : अधिकचे भाडे घेतल्यास होणार कारवाई

खासगी बसधारकांनो सावधान; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा
Private bus travel ticket rate hike
Private bus travel ticket rate hike

हिंगोली : आगामी सणासुदीच्या काळामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खासगी प्रवासी बसधारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. वास्तविक खासगी प्रवासी बसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दीडपटपेक्षा अधिक भाडे आकारू नये, अन्यथा प्रवासी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.

शासनाने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी करून कमाल भाडेदर निश्चित केली आहे. त्यानुसार कंत्राटी बसचे प्रतिआसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे ः ४४ प्रवासी क्षमता असलेल्या साधी बस (३x२) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी १३२० रुपये, पुणे-१००६, कोल्हापूर-१२४१, नागपूर-७१९, इंदूर (वाशीम मार्गे)-१००६, सुरत (औरंगाबाद मार्गे)-१३४६, औरंगाबाद-५१०, हैदराबाद-८३७, सोलापूर-९०२, अमरावती-३८०, अकोला-२७६, वाशीम-१०६, परभणी-१७१, नांदेड-१९७ रुपये प्रवासी भाडे आहे.

३९ प्रवासी क्षमता असलेल्या वातानुकूलित सिटसाठी हिंगोली येथून मुंबईसाठी १८७५ रुपये, पुणे-१४२३, कोल्हापूर-१७६३, नागपूर-१०२२, इंदूर (वाशीम मार्गे)-१४२२, सुरत (औरंगाबाद मार्गे)-१९१२, औरंगाबाद-७२६, हैदराबाद-११८९, सोलापूर-१२८२, अमरावती-१५५१, अकोला-३९३, वाशीम-१५२, परभणी-२४४, नांदेड-२८१ रुपये प्रवासी भाडे आहे.

४४ प्रवासी क्षमता असलेल्या नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी १८०० रुपये, पुणे-१३७३, कोल्हापूर-१६८६, नागपूर-९७४, इंदूर (वाशीम मार्गे)-१३७३, सुरत (औरंगाबाद मार्गे)-१८३५, औरंगाबाद-६९७, हैदराबाद-११४२, सोलापूर-१२४८, अमरावती-५२०, अकोला-३७८, वाशीम-१४६, परभणी-२३५, नांदेड-२७१ रुपये प्रवासी भाडे आहे.

३० प्रवासी क्षमता असलेल्या एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी २०२५ रुपये, पुणे-१५४४, कोल्हापूर-१९१७, नागपूर-११०३, इंदूर (वाशीम मार्गे)-१५४४, सुरत (औरंगाबाद मार्गे)-२०६५, औरंगाबाद-७८३, हैदराबाद-१२८४, सोलापूर-१३८४, अमरावती-५८३, अकोला-४२३, वाशीम-१६२, परभणी-२६२ तर हिंगोली ते नांदेडसाठी ३०२ रुपये एका प्रवाशास भाडे असेल.

तक्रारीसाठी हा ई-मेल

खासगी बसधारकांनी अधिकचे भाडे आकारल्यास प्रवाशांनी हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे. निश्चित भाडेदर विविध ठिकाणी खासगी प्रवासी बस बुकिंगच्या दर्शनी भागात, बसमध्ये, कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com