तान्हुलीला जन्म देणाऱ्या प्रियंकाच्या अवयदानातून तिघांना जीवदान

योगेश पायघन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

शहरातील 21 वे अवयवदान बुधवारी (ता 22) शहरात पार पडले. 20 दिवसांपूर्वी शहरात प्रसूत झालेल्या प्रियंका सागर जावळे (वय 25, रा. जावळे वाडा, वरणगाव ता भुसावळ जिल्हा जळगाव) यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळाले. तर हृदयाला गरजू रुग्ण उपलब्ध होऊ शकल्याने हृदयदान होऊ शकले नाही.

औरंगाबाद : शहरातील 21 वे अवयवदान बुधवारी (ता 22) शहरात पार पडले. 20 दिवसांपूर्वी शहरात प्रसूत झालेल्या प्रियंका सागर जावळे (वय 25, रा. जावळे वाडा, वरणगाव ता भुसावळ जिल्हा जळगाव) यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळाले. तर हृदयाला गरजू रुग्ण उपलब्ध होऊ शकल्याने हृदयदान होऊ शकले नाही.

वीस दिवसांपूर्वी हेडगेवार रुग्णालयात प्रसूत झालेल्या 25 वर्षीय प्रियंका जावळे यांना तान्हुली मुलगी झाली होती. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतरही मुलगी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होती. दरम्यान 14 ऑगस्ट ला प्रियंकाला मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी त्यांना शस्त्रक्रियेसाठी माणिक हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. 18 ऑगस्ट ला पहाटे त्यांची मेंदूची शस्त्रक्रिया झाली. मात्र मंगळवारी प्रियंका उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. स्वासही मंदावला होता. अशी माहिती माणिक हॉस्पिटलचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ  मकरंद कांजाळकर यांनी दिली. तिचा मेंदूमृत झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगून अवयवदान करण्यासाठी समुपदेशन केले. मंगळवारी उशिरापर्यंत झेड टी सी सी ने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

बुधवारी (ता 22) महिलेच्या अवयव दान प्रक्रियेला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. त्यासाठी नागपूरची न्यू व्हेरा हॉस्पिटलचे लिव्हर सर्जन डॉ. सक्सेना व टीमने लिव्हर काढून एक वाजेच्या सुमारास नागपूर येथे रवाना झाले. तर एक किडनी शहरातील सिग्मा व एक किडनी कमल नयन बजाज हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली. दरम्यान, चिमुकलीला भुसावळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर प्रियंकाचा देह वरणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी हलवण्यात आला. यात डॉ. मकरंद कांजळ कर, डॉ. शरद बिरादार, डॉ. मनोज निकम, डॉ. भास्कर मुसंडे, डॉ. माणिक देशपांडे, डॉ. बालाजी असेगावकर, समन्वयक जितेंद्र कुरकुरे, गोविंद काथार, झेड टी सी सी चे समन्वय मनोज गाडेकर यांनी परिश्रम घेतले.

शहरात अवयवदानाची चळवळ जोर धरत आहे हे मराठवाड्यातील हे 21 वे अवयवदान आहे.मात्र हृदय प्रत्यारोपण केवळ 9 झाले. हे प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने लक्ष घालून एअरलिफ्टची सुविधा निर्माण करावी. असे झाल्यास हृदय प्रत्यारोपनाची संख्याही वाढेल.- डॉ. उल्हास कोंडपल्ले, संचालक माणिक हॉस्पिटल, औरंगाबाद.

Web Title: priyanaka donates organ save 3 people life