Marathwada University News : प्रभारी प्र-कुलगुरूपदाची डॉ. सरवदेंकडे जबाबदारी ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या १ जानेवारीपासून रिक्त असलेल्या प्र-कुलगुरू व अधिष्ठाता या रिक्त पदांवर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सोमवारी तात्पुरत्या नियुक्ती केल्या आहेत.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या १ जानेवारीपासून रिक्त असलेल्या प्र-कुलगुरू व अधिष्ठाता या रिक्त पदांवर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सोमवारी तात्पुरत्या नियुक्ती केल्या आहेत. प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून डॉ. वाल्मीक सरवदे यांची निवड झाली असून, त्यांनी पदभार स्वीकारला.

यासह प्रशासनाकडून चार विद्याशाखांच्या अधिष्ठातांचीही नियुक्ती करण्यात आली. यामध्ये डॉ. महेंद्र शिरसाट विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखचे अधिष्ठाता असतील. मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, डॉ. वीणा हुंबे वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा तर डॉ. वैशाली खापर्डे आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता असतील.

sambhaji nagar
Marathi Language University : भाषेच्या रक्षण-संवर्धनासाठी विद्यापीठ

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा ३१ डिसेंबर २०२३ रोजी कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपला आणि अधिष्ठाता मंडळाचीही मुदत संपली. तेव्हापासून आजपर्यंत विद्यापीठात अधिष्ठाता आणि प्र-कुलगुरू कार्यरत नव्हते. विद्यापीठाचे १७ वे कुलगुरू म्हणून डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी रोजी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर प्र-कुलगुरू, अधिष्ठातापदाच्या नियुक्तीकडे उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चा होती.

अखेर कुलगुरूंनी सोमवारी या तात्पुरत्या नेमणूक जाहीर केल्या. यामध्ये प्र-कुलगुरू म्हणून डॉ. सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. यासह अधिष्ठातांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. पूर्णवेळ नेमणुका होईपर्यंत प्र-कुलगुरू व अधिष्ठाता काम पाहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com