नांदेड जिल्ह्यातील सात एपीआय झाले पीआय

police
police

नांदेड : मागील काही वर्षापासून प्रलंबीत पडलेल्या राज्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त लागला. पोलिस महासंचालक कार्यालयातून सोमवारी (ता. १०) राज्यातील ५०० एपीआय यांना बढती देऊन पोलिस निरीक्षक पद बहाल केली आहेत. जिल्ह्यातील सात जणांचा सहभाग असून त्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद दिघोरे यांना वाशिम तर वैजनाथ मुंडे यांना हिंगोली जिल्ह्यात पाठविण्यात आले. 

राज्यभरातील अनेक सहाय्यक पोलिस निरीक्षकांची पदोन्नती रखडली होती. लोकसभा निवडणूकीच्या अगोदर पदोन्नती मिळेल या आसेवर अनेक अधिकारी बसले होते. शेवटी याला मुहूर्त लागला असून पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी सोमवारी ५०० सहाय्यक पोलिस निरिक्षकांच्या पदोन्नतीवर बदलीच्या ठिकाणासह बदली आदेश काढले आहेत.

यात नांदेड जिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेतील गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले विनोद दिघोरे, वैजनाथ मुंडे, वाहतुक शाखेचे रफीक सय्यद यांना बाभूळगाव (लातूर) प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विशेष शाखेचे दिलीप तारे औरंगबाद शहर, उस्माननगर ठाण्याचे नितीन चिंचोलकर अकोला प्रशिक्षण केंद्र, एसीबीचे बळवंत पेडगावकर बाभूळगाव (लातूर) प्रशिक्षण केंद्र आणि विशेष सुरक्षा विभागाचे पांडूरंग गवते यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com