मालमत्ता खरेदी-विक्री निम्म्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

बीड - हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याने स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री निम्म्यावर आली आहे. सध्या खरेदी-विक्रीचे व्यवहार इसारपावती, भाडे करारनामा या पद्धतीनेच होत आहेत.

बीड - हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याने स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री निम्म्यावर आली आहे. सध्या खरेदी-विक्रीचे व्यवहार इसारपावती, भाडे करारनामा या पद्धतीनेच होत आहेत.

जमीन-सदनिका, रिकाम्या जागांची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, गहाणखत, इसार पावती, भाडे करारनामा, विवाह नोंदणी आदी विविध प्रकारच्या कामकाजाकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूल भेटतो; पण नोटाबंदीने हा महसूल चक्क निम्म्यावर आला आहे. नोव्हेंबर महिन्यात दोन हजार ६०० तर सुरू असलेल्या डिसेंबरच्या १५ तारखेपर्यंत केवळ ७०० दस्त नोंदणी करण्यात आले. गेल्या महिन्यात फक्त तीन कोटी ३९ लाख रुपयांचाच महसूल मिळाला. नोटाबंदीपूर्वी हा आकडा सहा कोटींहून अधिक होता. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीने थंडावलेले खरेदी - विक्री व्यवहार यंदाचा पुरेसा पाऊस आणि लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनींचा भरपूर मावेजा भेटल्याने वाढले होते. पण, नोटाबंदीने पुन्हा ‘... फाटक्‍यात पाय’सारखी स्थिती निर्माण झाली आहे. सुरवातीच्या दोन आठवड्यांमध्ये चलनटंचाई असल्याने मुद्रांक व नोंदणी कार्यालयांमध्ये किरकोळ दस्तांची कामेही थंडावली होती. ही किरकोळ कामे आता काही प्रमाणात होत असली, तरी जमीन खरेदीचे मोठे व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. 

मुद्रांक कार्यालयाच्या विभागांत दररोज किमान २० ते ३० मालमत्तांची खरेदी-विक्री व दस्तनोंदणी होत असे; परंतु व्यवहारातून नोटा बंद करण्यात आल्यामुळे दस्तनोंदणीच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मोठ्या मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार बहुतांश काळ्या-पांढऱ्या पैशातून होत असतात. एखाद्या मालमत्तेचा व्यवहार कागदोपत्री ठरल्यानुसार त्याचे रजिस्ट्री शुल्क भरण्यात येते आणि उर्वरित ठरलेली रक्कम ही संबंधितांना दिली जाते. हा पैसा काळा म्हणून ग्राह्य धरला जातो, अशा व्यवहारात हजार, पाचशेच्या नोटांचा अधिक व्यवहार होतो; परंतु नोटाबंदीच्या निर्णयामुळे व्यवहार अर्ध्यावर आले आहेत. सप्टेंबर महिन्यात अशा व्यवहारातून सात कोटी आठ लाखांचा महसूल मिळाला होता. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ तीन कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल भेटला आहे. 

Web Title: propertym purchasing sailing decrease