कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद - महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून काम करणाऱ्या 204 कर्मचाऱ्यांना सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर सेवेत कायम करण्याचा अशासकीय प्रस्ताव बुधवारी (ता. 11) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. 

औरंगाबाद - महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून काम करणाऱ्या 204 कर्मचाऱ्यांना सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर सेवेत कायम करण्याचा अशासकीय प्रस्ताव बुधवारी (ता. 11) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. 

महापालिकेत 268 कर्मचारी दैनिक वेतनावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत होते. त्यातील 64 कर्मचारी मृत किंवा सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, सोलापूर महापालिकेत 2001 व 2003 मध्ये एकूण 572 रिक्त पदांवर दैनिक वेतनावरील कर्मचारी कायम करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. याच धर्तीवर प्रस्ताव सभागृहनेता विकास जैन, सभापती राजू वैद्य यांनी मांडला होता. त्यास उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, सीताराम सुरे, बापू घडमोडे, गजानन बारवाल यांनी अनुमोदन दिले होते. बुधवारी हा प्रस्ताव मंजूर होताच कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करीत आंनदोत्सव साजरा केला व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

Web Title: The proposal to grant permanent employees