esakal | पोषण आहारात मिळणार प्रोटीन युक्त बिस्कीट
sakal

बोलून बातमी शोधा

buiscuits

पोषण आहारात मिळणार प्रोटीन युक्त बिस्कीट

sakal_logo
By
नवनाथ इधाटे पाटील

फुलंब्री : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात आता विद्यार्थ्यांना खिचडी सोबत कॅल्शियम व प्रोटीन युक्त बिस्कीट मिळणार असून जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये ग्रामीण व शहरी या दोन्ही भागातील शाळा कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. या बंद काळात शरीराला आवश्यक असलेल्या विविध प्रकारची प्रथिने मिळालेली नाही. याची भरपाई करण्याकरिता शासनाने कॅल्शियम व प्रोटीन युक्त बिस्कीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात आता विद्यार्थ्यांना खिचडी सोबत कॅल्शियम व प्रोटीन युक्त बिस्कीट देण्यासाठी पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थांची शासनाने यादी मागविली आहे. यादी पोहोचल्यानंतर ही बिस्कीट उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तालुक्यातील शासकीय अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना ही बिस्किटे दिली जाणार आहे.

न्यूट्रीटीव्ही स्लाइस या नावाने कॅल्शियम व प्रोटीन युक्त बिस्कीट शालेय पोषण आहारासोबत देण्याची शासनाची योजना असून या संदर्भात पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याची यादी मागविण्यात आलेली आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर येत्या महिना भरात याची अंलबजावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शालेय पोषण आहार लेखाधिकारी यांच्याकडून मिळाली आहे.

जि.प. व खासगी अनुदानित शाळांचा समावेश

  1. औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंत शाळा संख्या : ३०८१

  2. शालेय पोषण आहाराचे लाभार्थी संख्या : ४ लाख ५५ हजार

  3. शहरातील लाभार्थी संख्या : एक लाख ६ हजार ३००

  4. ग्रामीण भागातील लाभार्थी संख्या : तीन लाख ४२ हजार ६११

  5. यात जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे.

हेही वाचा: ऑपरेशन थिएटर बंद; महिला रुग्णांचे हाल

विद्यार्थ्यांना बिस्किटे आवडणार

शासनाने शालेय पोषण आहारात प्रोटीन व कॅल्शियम युक्त बिस्कीट देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गोड बिस्कीट म्हटले की विद्यार्थी जाम खूष होणार असून आवडीने खाणार आहे. खिचडी तर मिळणार पण या खिचडीची चव आणखी चांगली करण्यासाठी सोबतीला बिस्कीट उपलब्ध होणार आहे. यांचे शाळेत स्वागतच होईल, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे

loading image
go to top