एकदा लाभ घेतलेल्यांच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

अति आरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या होत आहे. कमी गुणवत्ता असलेला विद्यार्थी शासनात आला तर देशहिताला मारक नाही काय, असा सवाल करत शिक्षण व नोकरीत एकदाच आरक्षण द्यावे. आरक्षण दिलेल्यांच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये,
आरक्षणाचा पुनर्विचार करा, आदी मागण्यांसाठी शनिवारी (ता. ३१) सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या माध्यमातून निघालेल्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला.

बीड : अति आरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या होत आहे. कमी गुणवत्ता असलेला विद्यार्थी शासनात आला तर देशहिताला मारक नाही काय, असा सवाल करत शिक्षण व नोकरीत एकदाच आरक्षण द्यावे. आरक्षण दिलेल्यांच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये,
आरक्षणाचा पुनर्विचार करा, आदी मागण्यांसाठी शनिवारी (ता. ३१) सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या माध्यमातून निघालेल्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला.

शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चात विद्यार्थी व चिमुकलेही सहभागी झाले. अति आरक्षणामुळे गुणवत्तेचा खुन होत आहे, गुणवत्ता वाचली तरच देश वाचेल, सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन अशा आशयाचे फलक आणि टोप्या परिधान करुन मोर्चेकरी सहभागी झाले. बालाजी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

मुलीने निवेदन वाचले; पाच विद्यार्थ्यांनी निवेदन दिले
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोचल्यानंतर मुलीने निवेदन वाचून दाखविले. त्यानंतर पाच विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

या होत्या मागण्या
- कमी गुणवत्तेचा विद्यार्थी शासनात आला तर देशहिताला मारक.
- आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच असावी.
- शिक्षण व नोकरीत आरक्षणाचा लाभ एकदाच द्यावा. 
- आरक्षणाचा लाभ दिलेल्यांच्या पुढच्या पिढीला लाभ देऊ नये. 
- क्रीमीलेअरची आठ लाख रुपयांची मर्यादा कमी करावी. 
- आरक्षीत प्रवर्गाच्या उमेदवाराने खुल्या प्रवर्गात प्रवेश घेतला तर सवलती व शिष्यवृत्ती बंद करावी.
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना शिष्यवृत्ती देऊन शुल्क कमी करावे. 
- नॉन क्रीमीलेअरचे खोट्या प्रमाणपत्रावर घेतलेले प्रवेश रद्द करावेत. 
- गेल्या ७० वर्षात आरक्षणाचा लाभ घेतल्याची श्वेतपत्रिका काढावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest against Reservation in Bid