उन्नाव, कठुआ सामूहिक बलात्काराच्या विरोधात मोर्चा

आनंद खर्डेकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

परंडा : कथुआ (जम्मू कश्मीर) व उन्नाव (उत्तर प्रदेश) येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १६) तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. या दोन्ही घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली गोल्डन चौकापासून तहसील कार्यालयापर्यत मूकमार्चा काढण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार तुषार बोरकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कथुआ येथील आठ वर्षीय मुलीला मंदिरात बंदिस्त करून तिच्यावर सहा दिवस अत्याचार करून ठार करण्यात आले तर उन्नाव येथे घरकाम करणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर आमदाराने अत्याचार केला. पिडीत मुलीच्या वडिलांना धमकावल्याने त्यांचे निधन झाले.

दोन्ही घटनांतील नराधमांना फाशी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाजीद दखनी, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, नगरसेवक रत्नकांत शिंदे, संजय घाडगे, इरफान शेख, अॅड. जफर जिनेरी, संभाजी ब्रिगेडचे मनोज कोळगे, मराठा सेवा संघाचे राजकुमार देशमुख, जावेद पठाण नसीर शहाबर्फीवाले, छावा संघटनेचे अमर शेख, संतोष वारे, हाफीस मलिक सय्यद, अलिम मौलाना, बिलाल शेख, दीपक गायकवाड यांच्यासह शहरातील सर्वधर्मीय नागरिक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Protesters in Paranda demands capital punishment for Kathua rape case