कोळपेवाडी येथील घटनेच्या निर्षेधार्थ परभणीत सराफा व्यापाऱ्यांचा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोळपेवाडी (जि.नगर) येथे  घडलेल्या दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा सराफ असोसिएशनच्यावतीने बुधवारी (ता.22) बंद पाळला. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या सराफा व्यापाऱ्यांनी केली आहे.

परभणी- कोळपेवाडी (जि.नगर) येथे  घडलेल्या दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा सराफ असोसिएशनच्यावतीने बुधवारी (ता.22) बंद पाळला. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या सराफा व्यापाऱ्यांनी केली आहे.

कोळपेवाडी (ता.कोपरगाव जि.नगर) येथे रविवारी (ता.19) 14 ते 20 दरोडेखोरांनी श्री लक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर सराफ यांच्या दुकानातून 27 लाख रुपयांचे सोने - चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात श्याम सुभाष घाडगे (वय 36) या सराफा व्यापाऱ्यांचा मृत्यु झाला तर, अन्य गणेश घाटगे हे गंभीर जखमी आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा सराफा आसोसिएशनच्यावतीने बुधवारी (ता.22) सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व सराफा दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या घटनेतील दरोडेखोरांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. येत्या आठ दिवसात दरोडेखोर अटक झाले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सराफा व्यवसाईक आप-आपली दुकाने बेमुदत बंद ठेवतील असा इशारा परभणी जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी दिला आहे.

Web Title: protesting against the incident in Kolpewadi