Latur : ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार ; लातूरसह ठिकठिकाणी आंदोलन, प्रशासनाला निवेदन सादर

आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात लातूर येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली
latur
latur sakal

लातूर ; आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात लातूर येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या चौकशीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

राज्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही आमदार रोहित पवार सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत.

latur
Latur News : बसगाड्यांची उद्‌घोषणा झाली, सापडल्या बेपत्ता मुली ; पोलिसांनी लावला अवघ्या चोवीस तासांत दोन्ही बहिणींचा शोध

युवकांच्या प्रश्नावर त्यांनी युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले. यामुळेच सरकारने त्यांच्या मागे आता ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, कार्याध्यक्ष रशीद शेख, शहराध्यक्ष राजा मणियार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखा कदम, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा मोटे, लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मदन काळे, लातूर तालुका कार्याध्यक्ष बक्तावर बागवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, परमेश्वर पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष ॲड.विनायक शिंदे, कार्याध्यक्ष श्रीकांत मगर, पुरुषोत्तम पाटील, रेणापूर शहराध्यक्ष बालाजी कदम, नीळकंठ कावळे, ॲड. सुरेश पाटील , संजय सावरीकर, ॲड. अजित टेकाळे, सुनील बिडवे, सय्यद मुस्तफा, पाशा फरीद, राजे माधव, नामदेव पवार, श्रीकांत पवार, दीपक काळे, प्रमोद जाधव, लक्ष्मण साळुंके, अमोल पवार, गोविंद यालंगफळे आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com