कर घ्या पण, सुविधा द्या..., सातारा-देवळाईत महापालिका आयुक्तांना महिलांचा घेराव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - महापालिकेत येऊनही रस्त्यांविना नागरिकांनाचे हाल सुरू आहेत. आम्ही महापालिकेला कर देतो; पण तुम्ही सुविधा द्या, अशी मागणी करीत सातारा-देवळाई भागातील संतप्त महिलांनी शुक्रवारी (ता. 20) आयुक्तांना घेराव घातला. 

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी सातारा वॉर्ड कार्यालय, लक्ष्मी कॉलनी, आमदार रोड, अलोकनगर, नाईकनगर, सारा सिद्धी, छत्रपतीनगरासह इतर ठिकाणी भेटी देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी आयुक्तासह अधिकाऱ्यांना घेराव घालून आमचे प्रश्‍न कधी संपणार? असा सवाल केला. महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकास होईल, असे वाटले होते; मात्र आमचा भ्रमनिरास झाला आहे. ग्रामपंचायत असताना नागरिकांना मोफत पाणी मिळत होते; पण आता पैसे भरूनही पाणी मिळत नाही. नवीन योजना
होईपर्यंत किमान तीन वर्ष आम्हाला पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली. बांधकाम व्यावसायिकांनी तुम्हाला सेवा-सुविधा का दिल्या नाहीत, असा प्रश्‍न आयुक्तांनी केला असता, आता या भागात सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आमच्याकडून कर घ्या;
परंतु सुविधा द्या, अशी मागणी महिला-नागरिकांनी केली. यावेळी सातारा-देवळाई संघर्ष समिती व जनसेवा कृती समितीच्या पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती. 
 
अन्‌ फसली कार 
आयुक्तांसोबत पाहणीसाठी आलेल्या नगरसेविका सायली जमादार यांची कार एका खड्ड्यात फसली, त्यांच्या मागे आयुक्तांची गाडी होती. फसलेली कार निघण्याची प्रतीक्षा आयुक्तांना करावी लागली. कर्मचारी व नागरिकांनी प्रयत्न करून ही कार बाहेर काढली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com