हुतात्मा युवकांच्या कुटूंबियांना मदत द्या : मराठा क्रांती मोर्चा 

राजेभाऊ मोगल 
मंगळवार, 30 जुलै 2019

मराठा हुतात्म्यांच्या कुटूंबियांना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात यावी, तसेच दिलेल्या आश्‍वासनानुसार घरातील एकास सरकारी नोकरीची पूर्तता करावी, अन्यथा 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी धरणे आंदोलने करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आला. 

औरंगाबाद : ज्या समाजबांधवांनी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी बलिदान दिले, अशांच्या कुटूंबियांना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात यावी, तसेच दिलेल्या आश्‍वासनानुसार घरातील एकास सरकारी नोकरीची पूर्तता करावी, अन्यथा 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी धरणे आंदोलने करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आला. 

याबाबत मंगळवारी (ता. 30) दिलेल्या निवेदनात म्हटले, की कोपर्डी (जि. नगर) प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगष्ट 2016 रोजी मराठा क्रांती मुक मोर्चा काढण्यात आला. सरकारने मागण्यांकडे दूर्लक्ष केल्याने त्यानंतर झालेल्या आंदोलनादरम्यान 43 बांधवांनी बलिदान दिले. त्यावेळी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटूंबियांना शासनाने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

तसेच, त्याच्या घरातील एका व्यक्‍तीस सरकारी नोकरी देखील देऊ केली होती, मात्र, यापैकी कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाही. प्रलंबीत मागण्या येत्या 8 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide help to maryard s family demanded by Maratha Kranti Morcha